पेट्रोलच्या किंमती वाढणं अपरिहार्य – पंतप्रधान

November 13, 2011 9:21 AM0 commentsViews: 6

13 नोव्हेंबर

एकीकडे महागाई वाढत आहे त्यामुळे पेट्रोलच्या किंमती वाढणंही अपरिहार्य आहे. कारण आपल्याला त्यावर अनुदान देणं शक्य नाही असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं. आधीच अनुदानामुळे आपल्याला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यात आता पेट्रोलवर आणखी अनुदान देणं शक्य नाही. त्यामुळे पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती कमी होणार नाही हेही स्पष्ट झालं आहे. महागाई हा विकासाचा परिणाम असतो असं यापूर्वी पंतप्रधानांनी म्हटलं होतं. पण आता मात्र अन्नधान्याच्या वाढत्या किंमती ही सरकारची सगळ्यात मोठी चिंता असल्याचं पंतप्रधानांनी शनिवारी स्पष्ट केलं.

close