अभिनव उलगडणार गोल्ड मेडलच रहस्य

November 18, 2008 2:09 PM0 commentsViews: 6

18 नोव्हेंबर नवी दिल्लीदिग्विजय सिंग देव' ऑलम्पिकचं दडपण तुम्हाला मारून टाकतं. गोल्ड मेडलचं टार्गेट तर त्याहूनही वाईट 'असं अभिनव बिंद्रा म्हणाला होता. अभिनव बिंद्रा आणि त्याची कोच गॅबी बुलमन यांच्या कठोर परिश्रमामुळे भारताला ऑलम्पिकमधलं पहिलं वैयक्तिक गोल्ड मेडल मिळालं. आता ऑलम्पिकमधल्या यशानंतर बिंद्रानं नवं मिशन हाती घेतलं आहे. अभिनव बिंद्रा आणि गॅबी बुलमन आता त्यांच्या स्वप्नपूर्तीचं रहस्य उलगडून दाखवणार आहेत. आणि त्यासाठीच गॅबी भारतात आली आहे.ऑलिम्पिकच्या यशानं अभिनवला भारताचा हिरो बनवलं. सद्या तो मॅरेथॉनमध्ये भाग घेतो आणि हो जाहिरातींमध्येही झळकतोय. पण अजून एका गोष्टीत तो सध्या मग्न ओह.शूटिंगवरचं पुस्तक प्रकाशित करण्यात. जे त्यानं आणि गॅबीनं मिळून लिहीलयं. या पुस्तकातच असेल त्याने गोल्ड मेडलपर्यतचा प्रवास कसा केला तो.

close