गणेश कुलकर्णी हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा !

November 13, 2011 11:26 AM0 commentsViews: 3

13 नोव्हेंबर

गणेश कुलकर्णी हत्याप्रकरणातील सूत्रधारांना अटक झाली पाहिजे आणि हत्याप्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी गणेश कुलकर्णी यांच्या भाच्यांनी केली आहे. आयबीएन लोकमतशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. गणेश कुलकर्णी यांच्या उपळाई इथल्या घरात आता त्यांचा भाचा हरीश आणि भाची हर्षदा कुलकर्णी ही दोघंच राहत असतात. आम्ही आयपीएस किंवा आयएएस व्हावं अशी आमच्या मामाची इच्छा होती. अशा आठवणीही त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना जागवल्या. कृषिमंत्री शरद पवार यांच्या मतदारसंघ माढा इथं गणेश कुलकर्णी यांची 17 दिवसांपुर्वी हत्या झाली. याप्रकरणी 8 संशियतांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

close