राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे

November 14, 2011 9:08 AM0 commentsViews: 3

14 नोव्हेंबर

उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीला आता जेमतेम सहा महिने राहिले आहे. काँग्रेसने मात्र उत्तर प्रदेशातल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. नेहरू-गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अलाहबादच्या फूलपूरमध्ये राहुल गांधींची सभा सुरू आहे. मात्र फुलपूरमध्ये राहुल गांधींना समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. या सभेला भरपूर गर्दी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा रीटा बहुगुणा आणि केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद हेही राहुल गांधींसोबत आहेत.फूलपूरमध्ये राहुल गांधींचं हेलिकॉप्टर उतरताच त्यांचा निषेध करण्यासाठी हे काळे झेंडे दाखवले गेले.

close