ऊस आंदोलनामुळे वाढीव दर दिले नाही – अजितदादा

November 14, 2011 9:37 AM0 commentsViews: 1

14 नोव्हेंबर

ऊस उत्पादकांनी आंदोलन केलं, म्हणून आम्ही त्यांना वाढीव दर दिले नाही असा अजब दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. तर दुसरीकडे लवकरात लवकर कापूस खरेदी सुरु करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील असल्याचं अजित पवार यांनी सांगितले आहे. पण त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या कापसाला कमी दर मिळतोय हे त्यांनी मान्य केलं. हा दर वाढवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असंही ते म्हणाले. काँग्रेसचे 6 वेळा खासदार राहिलेले उत्तमराव पाटील यांच्यासह 180 जण आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. या निमित्ताने अजित पवार आज यवतमाळमध्ये आले आहे. त्यावेळी त्यांनी कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आंदोलनावर आश्वासन दिलं.

close