गिरणी कामगारांना 4 हजार तयार घरे सरकारने दिले नाही – शरद पवार

November 13, 2011 3:02 PM0 commentsViews: 2

13 नोव्हेंबर

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. गिरणी कामगारांची 4 हजार घरे तयार असूनही सरकारने अजुन वाटप केलेलं नाही. ही घरं लवकरात लवकर देणं राज्यसरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारन तत्काळ निर्णय घ्यावा असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राज्यातील माथाडी कामगारांना 10 हजार घरे सिडकोनं उपलब्ध करुन द्यावीत आणि नवी मुंबई विमानतळांसाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्याचेही पुनवर्सन करावे असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

close