अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यावर उद्योगक्षेत्रातून नाराजी

November 18, 2008 2:32 PM0 commentsViews: 7

18 नोव्हेंबर, दिल्लीदिल्लीतील इंडियन इकॉनॉमी परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी कंपन्यांना कि मती करण्याचा सल्ला दिला आहे. ' विकासाचं उद्दिष्ट गाठायचं असेल तर तेवढी मागणी वाढणं आवश्यक आहे आणि मागणी हवी असल्यास कंपन्यांनी किमतीबाबत विचार करणं गरजेचं आहे, असं अर्थमंत्री म्हणाले. विक्री वाढवायची असल्यास कंपन्यांनी किमतीमध्ये फेरबदल केले पाहिजेत, असा सल्ला त्यांनी दिलाय. ते दिल्लीतल्या इंडिया इकॉनॉमी परिषदेत बोलत होते. ' सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी ऑटो सेक्टरसाठी अधिक प्रमाणात कर्ज उपलब्ध होईल, असं सांगितलंय पण मुळात घरांच्या किंमती कमी केल्यानंतरच माणूस पुढल्या गाडी किंवा फ्लॅट अशा गोष्टींकडे वळेल ', असं पी चिदंबरम म्हणाले. दरम्यान, किंमती कमी करा या अर्थमंत्र्यांच्या सल्ल्यावर उद्योगक्षेत्राकडून नाराजी व्यक्त झालीय आहे. वस्तूंच्या किंमती कमी करणं, हा अडचणींवरचा उपाय नसल्याचं मत उद्योगपतींनी व्यक्त केलंय. कंपन्यांना होणारं नुकसान वाढल्यानं नफ्याचं प्रमाण याआधीच कमी झालंय. त्यात किंमती अजून कमी करणं शक्य नसल्याचं उद्योगपतींचं म्हणणं आहे. ' सरकारनं सांगण्याची काही गरज नाही. अर्थमंत्री देश चालवतात तर मी इंडस्ट्री चालवतो. कुठलाही फायदाआम्हाला नाही ', असं बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी सांगितलं तर डीएलएफचे के.पी. सिंह म्हणाले, किमती आधी जितक्या होत्या, त्यापेक्षा अजून कमी झाल्याचं आहेत. आम्हांला सल्ला देण्याची गरज नाही. टायर इंडस्ट्रीतही दर कमीच आहेत '.मोजर बायरचे दीपक कपूर म्हणाले, 'आम्ही डीव्हीडीचे भाव अजून कमी करू शकतच नाही. दुसर्‍या कंपन्या 350 रुपयांना डीव्हीडी विकतात,आम्ही 35 रुपयांना विकतो.आमची रेकॉर्डेबल डीव्हीडी साडेपाच रुपयांना पडते '.अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यावर अशा तीव्रप्रतिक्रिया उद्योगक्षेत्रात उमटल्या आहेत.

close