राष्ट्रवादीत 180 पदाधिकारर्‍यांचा प्रवेश

November 14, 2011 11:14 AM0 commentsViews: 2

14 नोव्हेंबर

यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादीने काँग्रेसला झटका दिला आहे. काँग्रेसच्या 180 पदाधिकार्‍यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षबदलाचा कार्यक्रम पार पडला. यात काँग्रेसचे 6 वेळा खासदार राहिलेले उत्तमराव पाटील, माजी आमदार विजय पाटील चोंडीकर आणि बापूराव पाटील पानघाटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, यवतमाळ जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील यांच्यासह 180 पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.

close