सचिन ऐवजी द्रविडची शानदार सेंच्युरी

November 14, 2011 11:35 AM0 commentsViews: 2

14 नोव्हेंबर

कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान दुसरी टेस्ट मॅच रंगतेय आणि या मॅचमध्ये द वॉल राहुल द्रविडने शानदार सेंच्युरी केली. टेस्ट क्रिकेटमधली ही त्याची तब्बल 36वी सेंच्युरी ठरली. द्रविड 119 रन्सवर आऊट झाला. सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डब्रेक सेंच्युरीच्या प्रतीक्षेत असलेल्या क्रिकेटप्रेमींना राहुल द्रविडने निराश होऊ दिलं नाही. सचिन 38 रन्सवर आऊट झाला पण द्रविडने आपली सेंच्युरी पूर्ण केली. तिसर्‍या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या द्रविडने आधी गौतम गंभीरबरोबर आणि नंतर सचिन तेंडुलकरबरोबर भक्कम पार्टनरशिप केली.

close