टीम अण्णा करणार 50 सदस्यांची भरती

November 13, 2011 4:43 PM0 commentsViews: 1

13 नोव्हेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या कोअर समितीची पुनर्रचना नाही तर विस्तार होणार आहे. अण्णांच्या या नव्या टीममध्ये जवळपास 50 सदस्य असतील. टीम अण्णाची आज एक महत्त्वाची बैठक झाली. त्यात कोअर समितीच्या विस्ताराबाबत सविस्तर चर्चा झाली. कोअर समितीत कुणाला ठेवायचं, यासाठी एक आचारसंहिता तयार करण्यात येणार आहे. एका महिन्यात ही आचारसंहिता तयार करु, असंही अण्णांनी सांगितलं.

दरम्यान, जनलोकपाल कमजोर करण्याचा सरकारचा डाव जनलोकपाल विधेयकाचे तुकडे तुकडे करुन त्याला कमजोर करण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप अण्णा हजारे यांनी केला. येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारने सशक्त लोकपाल आणलं नाही तर आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागेल असा इशाराही अण्णांनी सरकारला दिला. अण्णांनी कोअर कमिटीबाबत झालेल्या निर्णयाचीही माहिती दिली.

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनासाठीच्या कोअर कमिटीसाठीची आचारसंहिता या महिन्यातच तयार होईल. आणि कोअर कमिटीत येणार्‍या प्रत्येकाची नियुक्ती ही याच आचारसंहितेच्या निकषावर केली जाईल असंही अण्णांनी स्पष्ट केलं. टीम अण्णांच्या कोअर कमिटीचा विस्तार करण्यासाठी आता अण्णांनी युवकांचा समावेश करण्याचा निर्धार अण्णांनी केला. सध्या अनेक अर्ज आलेत, त्यातून निवड करुन मग कोअर कमिटीत घेण्याचा निर्णय होणार आहे. त्यापूर्वी ज्यांनी अर्ज केलाय त्यांची चौकशी निरीक्षकांमार्फत करुन येत्या दोन महिन्यात कोअर टीम तयार केली जाईल असं अण्णांनी स्पष्ट केलंय.

close