बाल दिनाचे गीफ्ट, नकोशी झाली ‘हवीशी’

November 14, 2011 12:12 PM0 commentsViews: 6

14 नोव्हेंबर

आज बालदिनाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातल्या शेटफळ इथे नकोशी नावाच्या मुलींचं नाव बदलण्यात आलं. त्यामुळे नऊ मुलींना बाल दिनाच्या निमित्ताने आपलं नवीन नाव मिळालं आहे. विशेष म्हणजे या नामकरण सोहळ्यात मुलींच्या वर्गातल्या मित्र-मैत्रीणींनीही सहभाग घेतला. म्हणूनच आजचा हा बालआनंद मेळावा या बच्चेकंपनीसाठी नेहमीपेक्षा वेगळा होता. मुलगा होईल या हव्यासापोटी मुलीला जन्म दिला आणि तिचं नाव नकोशी ठेवलं ही दुर्देवी कहाणी या नावामागे आहे. आयबीएन-लोकमतने नकोशी नावाच्या मुलींची कहाणी समोर आणली होती. त्यानंतर मोहोळ तालुक्याच्या सभापतींनी आपल्या तालुक्यातल्या नकोशी नावाच्या मुलींचा शोध घेतला. आणि त्यांचं शाळेतल्या हजेरीपटावरचं नाव बदलले.

close