गोंदियात पोलिसांकडून ग्रामस्थांना अमानुष मारहाण

November 14, 2011 12:57 PM0 commentsViews: 3

14 नोव्हेंबर

गोंदिया जिल्ह्यात अदानी प्रकल्पाविरोधात तक्रार नोंदवायला गेलेल्या रामाटोला इथल्या ग्रामस्थांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. गुरुवारी अदानी पॉवर प्लांटच्या सुरक्षा कर्मचार्‍यांशी झालेल्या झटापटी प्रकरणी तिरोडा पोलिसांनी रामाटोला इथल्या 22 नागरिकाना पहाटे 3 वाजता अटक केली. त्यापैकी 15 जणांना अमानूष मारहाण केली. पोलीस मारहाणीचे व्रण त्यांच्या शरीरावर उमटले आहेत. पॉवर प्लांटच्या वतीन रामाटोला-मेंदीपूर रस्ता गावकर्‍यांना विश्वासात न घेता तोडण्याचा प्रयत्न झाला होता. गावकर्‍यांनी तो हाणून पाडला. त्यानंतर गावकरी आणि सुरक्षा रक्षकात मारहाण झाली होती. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर प्रकरण मिटलं होतं. मात्र त्यानंतर गावकरी तक्रार नोंदवायला गेले आणि पोलिसांनी अदानी प्रकल्पाविरुध्द तक्रार तर घेतलीचं नाही मात्र उलट गावकर्‍यांनाच मारहाण केली.

close