छत्तीसगढमध्ये मोठा शस्त्र साठा जप्त

November 14, 2011 2:32 PM0 commentsViews: 4

14 नोव्हेंबर

छत्तीसगढ राज्यातील राजनांद गावच्या जंगल परिसरात शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारावर गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगढ पोलिसांच्या मदतीने या परिसरात संयुक्तपणे अभियान राबवून शस्त्राचा साठा शोधून काढला. यामध्ये 3, बारा बोअर रायफल, 3 नॉट 3 रायफलची 940 काडतूसं, 6 क्लेमोर माईन्स आणि मोठे हॅन्ड ग्रेनेड जप्त करण्यात आला आहे. नक्षलवादी कारवाया गेल्या काही दिवसात पुन्हा वाढल्यात त्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची आहे. नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळून लावल्याचे सध्या तरी या कारवाईवरुन दिसतं आहे.

close