आता अण्णांचाही मेणाचा पुतळा

November 14, 2011 3:11 PM0 commentsViews: 15

14 नोव्हेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी पुकारलेल्या आंदोलनाची छाप जगभरात उमटली. आता अण्णा हजारे यांचा मेणाचा पुतळा तयार होणार आहे. लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये हा पुतळा तयार होत आहे. याआधी अनेक सेलिब्रिटींचे मेणाचे पुतळे इथंच तयार करण्यात आले आहेत. लंडनच्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये असे अनेक पुतळेही मांडण्यात आले आहेतच. नुकताच करीना कपूरचाही पुतळा तिथं ठेवण्यात आला आहे. पण एखाद्या समाजसेवकाचा पुतळा पहिल्यांदाचा मांडण्यात येणार आहे. लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये हा पुतळा तयार होत आहे.

close