बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षाचा मुलगा ठार

November 14, 2011 4:55 PM0 commentsViews: 2

14 नोव्हेंबर

नालासोपारामध्ये बिबट्यांने केलेल्या हल्ल्यात एका 7 वर्षांच्या मुलाला मृत्यू झाला. आज सकाळी 7 वाजताची ही घटना आहे. नालासोपार्‍याच्या पूर्वेकडील पेल्हाप जामपाडा इथं झोपडी बाहेर खेळणार्‍या 7 वर्षांच्या गजानन लठाड याला बिबट्याने ठार मारल्याची घटना घडली. वसई तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. गजानन त्यांच्या झोपडीत खेळत असताना बिबट्याने त्याला झोपडीतून उचलून रानात नेलं. त्याला नेताना बघताच तिथल्या महिलांनी आरडा ओरडा केला आणि त्यामुळे बिबट्या गजाननला तिथंच टाकून पळला. गजाननला हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सागितलं. गजाननवर हल्ला करणार्‍या बिबट्याचा पोलीस आणि वनरक्षक अधिकारी शोध घेत आहे. पण, अद्यापही बिबट्या सापडला नाही.

close