दिलीप प्रभावळकरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

November 14, 2011 5:15 PM0 commentsViews: 2

14 नोव्हेंबर

प्रसिद्ध अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांना आज कोलकातामध्ये साहित्य अकादमीचा बालसाहित्यासाठी दिला जाणारा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोलकाताच्या रामकृष्ण मिशन इन्सटिट्यूट ऑफ कल्चर सेंटर मध्ये झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात प्रभावळकरांचा हा गौरव करण्यात आला. बालकथा जगतातल्या नायक समजल्या जाणार्‍या त्यांच्या 'बोक्या सातबंडे' या कथांना हा मानाचा सन्मान मिळाला. यापूर्वी नुकतांच दिलीप प्रभावळकरांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. आता त्यांच्या 'बोक्या सातबंडेने साहित्यक्षेत्रात प्रतिष्ठेचा मानल्या जाणारा बाल साहित्यासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कारही पटकावला आहे.

close