पुण्यात टेकड्या वाचवण्यासाठी पर्यावरण संस्थांचा पुढाकार

November 14, 2011 5:26 PM0 commentsViews: 7

14 नोव्हेंबर

पुणे महापालिकेच्या हद्दीतील समाविष्ट गावांमधील टेकड्यांवर कसलंही बांधकाम होऊ नये याकरता पुण्यातील पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. ग्रीन पुणे मुव्हमेंट या नावाने टेकड्या वाचवण्याची चळवळ उभारण्यात येणार असून 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान विविध महाविद्यालयं, हाऊसिंग सोसायट्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. 20 ते 25 नोव्हेंबर दरम्यान, सायकल रॅली, धरणं आंदोलन करण्यात येणार असून 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 26 नोव्हेंबर रोजी गुडलक चौक ते संभाजी पार्क अशा महारॅलीचही आयोजन केलं जाणार आहे. याशिवाय शहरातील वेगवेगळ्या टेकड्यांवर सह्यांची मोहीमही राबवली जाणार आहे.

close