सेंसॉर बोर्डाचे कार्यालय मनसे कार्यकर्त्यांनी फोडले

November 14, 2011 5:36 PM0 commentsViews: 1

14 नोव्हेंबर

मुंबईतल्या वाळकेश्वरमधल्या सेंसॉर बोर्डाच्या ऑफिसची मनसे कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. मनसेच्या चित्रपट कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सेंसॉर बोर्डाचे ऑफिस फोडलं. मराठी चित्रपटांना सेन्सॉरचे प्रमाणपत्र देताना जे पॅनेल असतं त्या पॅनलमध्ये मराठी दिग्दर्शक नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते संतापले. गेल्या 6 महिन्यांपासून ही मागणी करुनही मराठी दिग्दर्शक नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड करण्यात आली.

close