प्रियकराच्या भावी पत्नीची हत्या करणार्‍या अनुश्रीला कोठडी

November 15, 2011 11:06 AM0 commentsViews: 4

15 नोव्हेंबर

प्रेमाच्या त्रिकोणातून प्रियकराच्या होणार्‍या पत्नीला जाळल्याप्रकरणी संशयित असलेली अनुश्री कुंद्रा पुण्याच्या कॅन्टोन्मेंट कोर्टात शरण आली. अनुश्री कुंद्राला कोर्टाने 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 13 ऑक्टोबरला अनुश्रीने जुही प्रसाद आणि निमेष सिन्हा यांच्यावर पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. यात जुही प्रसाद हिचा मृत्यू झाला आहे.यापुर्वी अनुश्रीने दिल्ली हायकोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवला होता. वानवाडी येथे न्यू मार्केट प्लाझा सोसायटीत 13 ऑक्टोबरला अनुश्री हिने तिचा प्रियकर निमेश सिन्हा आणि त्याची भावी पत्नी जूही प्रसाद या दोघांना पेटवून दिले होते. यात जूहीचा मृत्यू झाला. मात्र निमेश यातून बचावला. निमेशबरोबर जूहीचे लग्न ठरल्यामुळे रागाच्या भरात अनुश्रीने हे कृत्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दरम्यान दिल्ली हायकोर्टातून अनुश्रीने जामीन मिळवला होता. त्यानंतर ती फरार झाली होती अखेर आज पुण्याच्या पुण्याच्या कॅन्टोन्मेंट कोर्टात शरण आली. अनुश्री कुंद्राला कोर्टाने 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

close