कापसाच्या प्रश्नी राजू शेट्टी उतरणार रस्त्यावर

November 14, 2011 5:43 PM0 commentsViews: 339

14 नोव्हेंबर

ऊसाच्या यशस्वी आंदोलनानंतर राजू शेट्टी आता कापूस आणि उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. कापसाला प्रती क्विंटल 6 हजार रुपये आणि सोयाबिनला 3 हजार रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी स्वामिभानी शेतकरी संघटनेनं केली आहे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा घेण्यात येणार आहे. बुलठाणा इथं 27 नोव्हेबरला हा शेतकरी मेळावा घेणार असल्याच खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

close