स्थानिकांना नोकरी देण्याच्या सरकारच्या निर्णयावर विरोधकांची टीका

November 18, 2008 2:45 PM0 commentsViews: 10

18 नोव्हेंबर, मुंबई एमआयडीसीच्या जमिनीवरील उपक्रमांमध्ये भूमिपुत्रांना 80 टक्के नोकर्‍या देण्याचा निर्णय सरकारनं घेतला पण हा निर्णय सरकारनं निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. '1972 पासून हा कायदा अस्तित्वात आहे पण सरकारनं त्याची अंमलबजावणी केलेली नव्हती. मराठी भाषा आणि पाट्यांबाबत आश्वासनं दिली गेली पण काहीच झालं नाही. हा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे. मराठी मुलांची दिशाभूल करण्याचा काँग्रेस आणि एनसीपीचा फसवा डाव आहे ', असं शिवसेनेचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी पत्रकारांना सांगितलं. दरम्यान, हा निर्णय औद्योगिक धोरणाला अनुसरूनच आहे, असं सरकारनं स्पष्ट केलंय. पण मनसेनंही या निर्णयाची खिल्ली उडवलीय. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं मराठी माणसाचं लांगुलचालन केलंय, असं पत्रक मनसेनं काढलंय.

close