ऊसाच्या शेतात सापडली बिबट्याची 2 पिल्लं

November 15, 2011 11:18 AM0 commentsViews: 2

15 नोव्हेंबर

नाशिकमधील सटाणा तालुक्यातल्या जरोन गावात ऊसाच्या शेतात बिबट्याची दोन पिल्लं सापडली आहेत. या बिबट्याच्या पिल्लांना गावकर्‍यांनी नंतर एका पिंजर्‍यात ठेवलं आणि त्यांची काळजीही घेतली. सध्या ऊसाची तोडणी सुरु असल्याने ऊसतोड कामगारांना ही पिलं सापडली. उसाच्या फडात सुरक्षेसाठी बिबट्याची मादी पिलं ठेवते. पण ऊसतोड सुरू झाल्यावर ही पिलं उघड्यावर येतात. त्याचवेळी या पिलांची आई भक्ष शोधायला गेलेली असते.परत आल्यानंतर पिल्लं तिला दिसतं नाहीत आणि त्यामुळे सैरभैर होऊन मग बिबट्या माणसांच्या वस्तीत शिरकाव करण्याच्या घटना समोर येतात. यामुळे आता वनविभाग या मादीचा शोध घेत आहे.

close