कल्याण डोंबिवली पालिका ‘निदान’वर मेहरबान !

November 15, 2011 12:56 PM0 commentsViews: 9

अजित मांढरे, कल्याण

15 नोव्हेंबर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आता पुन्हा वादात सापडली आहे. पालिकेच्या अटी आणि शतीर्ंचा भंग केला असला तरीही अभि निदान डायग्नॉस्टिक सेंटरवर कारवाई करण्यात पालिका कुचराई करत असल्याचा आरोप पालिकेवर केला जात आहे. पण, पालिका मात्र अजूनही या निदान सेंटरवर कारवाई करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही.

कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना स्वस्त दरात चांगली आरोग्य सेवा मिळावी याकरता पालिकेनं खाजगी तत्वावर हे अभी निदान डायग्नॉस्टिक सेंटर उभारलं. पण, याच निदान सेंटरच्या अनागोंदी कारभारामुळे पालिका अडणीत आली. 10 लाख रुपयांची बँक गॅरंटी अजूनही सेंटरने दिली नाही.

चार खोल्यांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आलंय. या सेंटरमध्ये असलेली उपकरणं ही परदेशात भंगारात काढण्यात आलेली उपकरणं आहेत. तसेच उपकरणांची बिल दिली नाहीत. उपकरणं सुमार दर्ज्याची आहेत. 24 तास रेडिओलॉजिस्ट उपलब्ध नसतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सेंटरमधील कामाचा अहवाल पालिकेत सादर केला नाही.

उपायुक्त गणेश देशमुख म्हणतात, जेव्हा करार केला तेव्हांच हे सगळ करायला पाहिजे होतं. हे निदान सेंटर अभी डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 30 वर्षांसाठी महिना 1000 हजार रुपये भाड्याने देण्यात आलं आहे. या सेंटरसाठी पालिकेने स्वतः 30 लाख रुपये खर्चकरुन 500 के वी चा ट्रान्सफार्मर बसवला आहे. डायग्नोस्टिकसाठीची उपकरणांवर पालिकेने 25 लाखांची जकात माफ केली. मोफत पाणी दिलंय.

वसई विरारमध्ये ज्यांचा दबदबा आहे अशा हितेंद्र ठाकूर यांच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाचं हे निदान सेंटर आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेनं या निदान सेंटरवर काही जास्तच मेहरबानी केली. महापौरांना हा प्रश्न जास्त म्हत्वाचा वाटत नाही.

महापौर वैजंती गुजर-घोलप म्हणतात, या प्रश्नापेक्षा मी कल्याण डोंबवलीतील रस्त्यांवर जास्त लक्ष देईन. तर दुसरीकडे या निदान सेंटरने मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहे.

सेंटर प्रमुख तीनाल सचदेवा म्हणतात, आम्ही एका ही अटीचा भंग केला नाही उलट पालिकेनंच त्यांनी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत.

निदान सेंटरच्या प्रकरणावर चौकशी झाली आहे आता शेवटचा निर्णय घेण्याचे अधिकार पालिकेचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांच्याकडे आहेत.या प्रकरणाच्या बाबतीतही आयुक्त योग्य तोच निर्णय घेतील असं सर्वांना वाटतंय.

close