सरकारी कर्मचार्‍यांच्या एक दिवसीय संपात फूट

November 15, 2011 9:05 AM0 commentsViews: 1

15 नोव्हेंबर

राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या एक दिवसाच्या लाक्षणिक संपात फुट पडली आहे. राजपत्रीत अधिकारी महासंघ आणि कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तर कर्मचारी मध्यवर्धी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना मात्र संपात सहभागी झाली. त्याचा संमिश्र परिणाम कामकाजावर झाला. औरंगाबादचे द्वितीय आणि तृतीय श्रेणीतले कर्मचारी, सरकारी रुग्णालयातल्या नर्स या संपात सहभागी झाल्या आहेत. निवृत्तीचं वय 60 वर्ष करणे, 5 दिवसांचा आठवडा करणे, महागाई भत्ता वाढवणे, रिक्त पदं भरणे या मागण्यांसाठी हा संप होत आहे.

close