कोल्हापुरात भरदिवसा गुंडांचा हैदोस

November 15, 2011 2:39 PM0 commentsViews: 1

15 नोव्हेंबर

कोल्हापुरातील यादवनगर परिसरामध्ये दोन गटांच्या वादातून घरांची आणि गाड्यांची मोठ्याप्रमाणात तोडफोड करण्यात आली. त्याचबरोबर महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याची घटना घडली. यादव नगर परिसरामध्ये सलीम मुल्ला आणि कुरणे गटात गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाला होता. या वादातून मुल्ला गटाच्या गंुडांनी कुरणे गटाच्या लोकांना सोमवारी मारहाण केली होती. त्यानंतर कुरणे गटाने याबाबत राजारामपुरी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

अंतर्गत वाद असताना पोलिसात तक्रार का दाखल केली असा जाब विचारत चिडलेल्या मुल्ला गटाच्या गुंडांनी आज सकाळी कुरणे गटाच्या लोकांच्या घरावार हल्ला चढवला. त्यानंतर घरातील साहित्याचे नुकसान करुन दारात उभ्या असलेल्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. त्याचबरोबर महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागीने लंपास केलेत. याबाबात राजारामपुरी पोलीसात तक्रार दाखल झाली असून अकरा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातल्या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

close