गिरणी कामगारांचा मुंबई पालिकेला घेराव

November 15, 2011 9:11 AM0 commentsViews: 1

15 नोव्हेंबर

गिरणी कामगारांच्या घरासाठी गिरणी मालकांनी पुकारलेल्या असहकाराच्या विरोधात आज सर्व गिरणी कामगार संघटनांनी मुंबई महापालिकेला घेराव घातला. गिरणी मालकांनी गिरण्यांची एकतृतीयांश जमीन कामगारांच्या घरासाठी म्हाडाकडे सुपूर्द करणं बंधनकारक आहे. तरी अनेक गिरणी मालकांनी ती अजुनही म्हाडाकडे सुपूर्द केलेली नाही. त्यामुळे या गिरण्यांच्या जागेवर सुरू असलेल्या बांधकामांना महापालिकेनं स्टे ऑर्डर द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनाच्या वेळी अनेक कामगार नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर या आंदोलकांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी आत सोडलं. पण आयुक्तांनी अपमानास्पद दिल्याचा आरोप या शिष्टमंडळानं केला.

close