वाशीममध्ये गेल्या वर्षभरात 133 शेतकर्‍यांची आत्महत्या

November 15, 2011 3:58 PM0 commentsViews: 6

मनोज जयस्वाल, वाशीम

15 नोव्हेंबर

ऊसाला चांगला दर मिळाल्याने पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकरी आनंदात असताना दुसरीकडे विदर्भात कापूस, सोयाबीन शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्विकारतोय. वाशीम जिल्हयात गेल्या वर्षभरात 133 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

वाशीम जिल्ह्यातील येवता गाव..या घरात स्मशानशांतता पसरली. काही दिवसांपूर्वी अवचार कुटंुबातला मोठा मुलगा देवराव याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातल्या बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सोयाबीनला मिळणारा कमी भाव आणि त्यातून वाढलेला कर्जबाजारीपणा यामुळे त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचे त्याच्या वडिलांचे म्हणणं आहे. कापूस, सोयाबीन शेतकर्‍यांच्या पाठीमागे खंबीर नेतृत्व नसल्याने शेतमालाला भाव मिळत नाही आणि कर्जाचा डोंगर उभा राहतोय. त्यामुळेच विदर्भातल्या शेतकर्‍यांना आत्महत्येसारखा मार्ग स्विकारावा लागतोय.

close