किंगफिशर एअरलाईन्स बंद करणार नाही – विजय माल्ल्या

November 15, 2011 11:34 AM0 commentsViews: 6

15 नोव्हेंबर

किंगफिशर एअरलाईन्स बंद करणार नाही, अशी घोषणा विजय माल्ल्या यांनी केली. तसेच सरकार किंवा बँकांकडून आर्थिक मदत मागितली नसून कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची नोकरकपात होणार नसल्याचं माल्ल्यांनी स्पष्ट केलं. किंगफिशर एअरलाईन्स तोट्यात आल्यानंतर आता कंपनीची पुढची धोरणं काय असतील याविषयी माल्ल्या यांनी पत्रकार परिषद घेतली.

होणारं नुकसान कमी करण्यासाठी काही मार्गावरची उड्डाणं रद्द करण्यात आली. त्यामुळेच लो कॉस्ट सेवा किंगफिशर रेड बंद करण्यात आली होती असं माल्ल्यांनी सांगितल. किंगफिशर क्लास म्हणजेच बिझनेस क्लास सेवा वापरणारा ग्राहक वर्ग मोठा आहे. त्याचे 20 लाख मेंबर्स आहेत. त्यामुळे बिझनेस क्लासवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे माल्ल्यांनी जाहीर केलं.

ज्या रूट्सवर नुकसान होतं आहे तिथे सेवा देऊ शकत नाही रूट्सची पुनर्रचना केली जाईल असंही माल्यांनी स्पष्ट केलं. सोबतच एटीएफ (ATF) वरच्या सेल्स टॅक्सबद्दल विचार होणं गरजेचं आहे आणि हा टॅक्स गेला तर सगळ्यात मोठा फायदा एअर इंडियालाही होईल असंही मत त्यांनी व्यक्त केलं. यासोबत देशांतर्गत विमानसेवांमध्ये 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

close