पुण्यात कॅन्टॉमेन्टच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांचा धुडगूस

November 15, 2011 4:37 PM0 commentsViews: 1

15 नोव्हेंबर

पुण्यातील खडकी कॅन्टॉमेन्ट बोर्डाच्या कार्यालयात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घालत तोडफोड केली.खडकी कॅन्टॉमेन्ट बोर्डाच्या टोल नाक्यावर अवैधरित्या टोल आकारला जातो आणि जड वाहनं दिवसभर शहरात सोडली जातात. यामुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढलं त्यामुळे ही वाहतूक बंद करावी असं निवेदन मनसेन दिलं होतं. मनसेचे शिवाजीनगर अध्यक्ष शिवाजी पवार यांनी आज छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंते अरुण गोडबोले यांच्या कार्यालयात जाऊन तक्रारीची दखल का घेतली नाही असा जाब विचारला आणि तोडफोड केली. शिवाजी पवारला खडकी पोलिसांनी अटक केली अरुण गोडबोले यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

close