स्टीव्ह जॉब्ज यांचे चरित्र वाचकांच्या भेटीला

November 15, 2011 4:47 PM0 commentsViews: 6

15 नोव्हेंबर

ऍपलचे सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्ज यांचं चरित्र मराठीमधून रसिकांच्या भेटीला येतं आहे. प्रकाशनापुर्वीच त्याची पहिली आवृत्ती संपली आहे. हे पुस्तक उद्या बाजारात येणार आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी मार्केटमध्ये आणलेल्या प्रॉडक्टसशी माहितीही त्यांचे अनुभव या पुस्तकात आहेत. त्यांचं वैयक्तिक आयुष्यही यात उलगडण्यात आलं आहे. पहिल्या आवृत्तीच्या 3000 प्रतींची विक्री झाली आहे. दुसरी आवृत्तीही लवकरच बाजारात येणार आहे. वॉल्टर आयझॅकसन यांनी स्टीव्ह जॉब्ज एक्सक्लुझिव्ह बायोग्राफी हे मूळ चरित्र लिहिलं आहे तर याचा मराठीत अनुवाद विलास साळुंके यांनी केला आहे. स्टीव्ह जॉब्जचे अधिकृत चरित्र या नावानं हे पुस्तक मराठीत उपलब्ध झाले आहे.

close