उत्तर प्रदेशची 4 राज्य करण्याची मायावतींची घोषणा

November 15, 2011 5:20 PM0 commentsViews: 7

15 नोव्हेंबर

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आज राज्याची पुनर्रचना करण्याची अचानक घोषणा केली. आणि निवडणूक प्रचाराचा सूरच बदलला. देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याचे चार छोट्या राज्यांत विभाजन करण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने मंजूर केल्याचं मायावतींनी सांगितलं. पूर्वांचल, पश्चिम प्रदेश, बुंदेलखंड आणि अवध प्रदेश अशी चार छोटी राज्यं बनवण्याचा प्रस्ताव आहे. पुढच्या आठवड्यात हा प्रस्ताव मतदानासाठी विधानसभेत मांडला जाईल. छोटी राज्य झाल्यामुळे प्रशासन प्रभावी पद्धतीने करता येईल असं मायावती यांनी म्हटलं आहे. समाजवादी पक्षाने या प्रस्तावाला कडाडून विरोध केलाय. तर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. नवं राज्य निर्माण करण्याचा अधिकार केंद्राकडे आहे. आणि पूर्ण प्रक्रियेला वेळ लागणार असला तरी निवडणुकीच्या आधी अचानक घोषणा करून मायावतींनी बेसावध विरोधकांना प्रचारात धक्का दिला.

close