‘ भैय्या हातपाय पसरी ‘ वर पोलीस अहवाल देणार

November 18, 2008 3:31 PM0 commentsViews: 7

18 नोव्हेंबर, मुंबई आशिष जाधव ' भैय्या हातपाय पसरी ' या नाटकावर राज्य सरकारकडून बंदी घालण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या नाटकालाही उत्तर भारतीयांनी आक्षेप घेतला होता. प्रसाद कांबळी हे या नाटकाचे निर्माते आहेत. या नाटकाचे अडीचशेहून अधिक प्रयोग झाले आहेत. मराठी-अमराठी पुन्हा वाद नको, म्हणून सरकारनं वादग्रस्त ' देशद्रोही ' या चित्ररपटावरही बंदी घातली होती. आता ' भैय्या हातपाय पसरी ' वरही बंदीसाठी हालचाली सुरू झाल्यात. पोलिसांनी नाट्य सेन्सॉर बोर्डाकडून नाटकांची संहिता मागवली आहे. याबाबतचा अहवाल गृहखात्याला उद्या देण्यात येणार आहे. ' दोन वर्षांपूर्वी हे नाटक आलं आहे.सेन्सॉर बोर्डानं प्रमाणपत्र दिलं आहे.नाटकात आक्षेपार्ह काहीच नाही ', असं सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष फ.मु.शिंदे यांनीआयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं.

close