नितेश राणेंची काँग्रेसला आघाडीची ऑफर

November 16, 2011 10:33 AM0 commentsViews: 3

16 नोव्हेंबर

स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी चक्क काँग्रेसलाच ऑफर दिली आहे. राष्ट्रवादीची आघाडी करण्यापेक्षा स्वाभिमानशी आघाडी करा, अशी ऑफर त्यांनी काँग्रेसला दिली आहे. स्वाभिमानचे उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर लढतील. मुंबईत पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त 10 ते 12 उमेदवार निवडून येतील. याउलट स्वाभिमानची काँग्रेसला मोठी मदत होईल असंही राणे यांनी म्हटलं आहे.

close