रितेश-जेनेलिया लवकरच लग्नाच्या बेडीत !

November 16, 2011 11:31 AM0 commentsViews: 9

16 नोव्हेंबर

नऊ वर्षांच्या रोमान्स नंतर अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसोझा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. हा विवाह सोहळा 4 फेब्रुवारीला होणार असल्याची चर्चा आहे. यासाठी हयात रिजन्सी हे स्थळ निश्चित करण्यात आलं आहे. 'तुझे मेरी कसम' या सिनेमातून रितेश-जेनेलिया या दोघांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. नंतर ही दोघं 'मस्ती' या सिनेमातही एकत्र झळकली. तेव्हा पासून त्यांचं सूत जुळल्याच्या चर्चा रंगत होत्या. आता या सगळ्या गॉसिपला पूर्णविराम लागलाय हे मात्र नक्की…विलासरावांच्या सेलिब्रिटी पुत्राच्या लग्नाला बच्चन कुटूंबीय, करण जोहर, साजिद खान, इम्रान खान, बोमन इराणी अशी बॉलिवूड मंडळी हजेरी लावणार आहेत.

close