रणरागिणींचा पोलिसांवर हल्लाबोल

November 16, 2011 11:39 AM0 commentsViews: 6

16 नोव्हेंबर

फलटणमधल्या फरांदवाडीतल्या महिलांनी हातातल्या बांगड्या फोडून हातात काठ्या कोयते घेत आपला संताप व्यक्त केला. त्यांच्या या रणरागिणी रुपामुळे गावातल्या पुरुषांबरोबर पोलीसही हबकले आहेत. तिथं सध्या संतापाचे वातावरण आहे. 5 नोव्हेंबरच्या रात्री इथल्या एका कुटुंबाच्या झोपडीत सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकून, तिथल्या महिलेवर तिचा पती आणि मुलांसमोरच बलात्कार केला. पोलिसांनी तातडीने हालचाली करुन 7 तारखेला 2 आरोपींना अटक केली.

मात्र अवघ्या दोनच दिवसात यातला प्रमुख आरोपी कौशा भोसले पोलिसांच्या तावडीतून पळाला. त्यानंतर सातार्‍याचे पालकमंत्री रामराजे निंबाळकर यांनीही फरांदवाडीचा दौरा केला. भाषणबाजीही केली. पण महिलांचा संताप कमी झाला नव्हता. अखेर त्यांचा संतापाचा स्फोट झाला आणि त्यांनी बांगड्या फेकत 'घोषणाबाजी नको, न्याय द्या' असा पुकारा करत रुद्रावतार धारण केला. महिलांच्या या आंदोलनाच्या हिसक्यान पोलीस तर हडबडलेच पण गावकरीही स्तब्ध झाले.

या महिलांना आता परिसरातील गावकर्‍यांचांही पाठिंबा मिळतोय. आरोपी कौशा भोसले लपून बसलेल्याची माहिती कळताच गावकरी लाठ्या काठ्या आणि कोयते घेऊन ऊसाचा फड पिंजून काढत आहे. फरांदवाडीच्या महिलांचा संताप पाहून आता भाषणं ठोकणारे राजकारणीही तिथं जायचं टाळत आहे.

close