मारुती नवलेंवर गुंडगिरीचा चैनसुख गांधींचा आरोप

November 16, 2011 5:01 PM0 commentsViews: 2

अद्वैत मेहता, पुणे

16 नोव्हेंबर

पुण्यातील पवन गांधी ट्रस्ट जमीन फसवणूक प्रकरणी सिंहगड संस्थेचे संस्थापक मारूती नवले आता आणखीन अडचणीत सापडू लागले आहे. एकीकडे नवलेंनी ट्रस्ट च्या विरोधातील 2 महत्वाच्या याचिका कोर्टातून मागे घेत ट्रस्टने शाळेचा आणि जागेचा ताबा घ्यावा असं लेखी पत्र दिलं आहे. तर दुसरीकडे जागेवर गुंड ठेवून चैनसुख ट्रस्टच्या माणसांवर दगडफेक करून त्यांना पळवून लावण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. पवन गांधी शाळेच्या जागेच्या वादावरुन चैनसुख गांधींनी न्यायालयीन लढाई लढल्यानंतर मारुती नवले अडचणीत आले. नवलेंनी एक पाऊल मागे घेत शाळा आणि जमीन दोन्हीवरचा ताबा सोडायची तयारी दाखवली. 2 नोव्हेंबरला पुणे कोर्टात अर्ज करत या प्रकरणातील 2 याचिका माघारीही घेतल्या. पण प्रत्यक्षात शाळेचं सामान चोरून जागेवर गुंड ठेवल्याचा आरोप चैनसुख गांधींनी केला. नवलेंनी दिवाळीच्या सुटीनंतर वारजे भागात शाळा हलवलीय.

जागेचा ताबा सोडताना नवलेंनी दरवाजे- खिडक्या ग्रील्स असं ट्रकभर सामान नेलं. नंतर तक्रार केल्यानंतर आणूनही टाकलं. पौड पोलिसात या चोरीबद्दल तसेच गुंडगिरी-दहशतीविरोदात ट्रस्टचे सदस्य रवी बर्‍हाटे यांनी एफआयआर दाखल केली. सुप्रीम कोर्टात येत्या शुक्रवारी 18 नोव्हेंबरला नवलेंच्या अंतरीम जामीनावर सुनावणी आहे. त्याकडेच सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

close