कॅगवर दबावाचा आरोप मुरली मनोहर जोशींनी फेटाळला

November 16, 2011 5:24 PM0 commentsViews: 2

16 नोव्हेंबर

संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी 2 जी घोटाळ्याप्रकरणी कॅगवर दबाव टाकल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे. 2 जी घोटाळ्यात 1 लाख 76 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल कॅगने तयार केला होता. पण हा अहवाल तयार करण्यापूर्वीच मुरली मनोहर जोशी कॅगच्या संपर्कात होते. आणि त्यांनी अहवाल तयार करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होतोय. मुरली मनोहर जोशी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप फेटाळून लावला.

close