दमाणी साहित्य पुरस्कार जाहीर

November 16, 2011 2:54 PM0 commentsViews: 7

16 नोव्हेंबर

सोलापूरचे साहित्यातील प्रसिद्ध भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या 'तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ' या साहित्यकृतीला पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर कवी नागराज मंजुळे यांच्या 'उन्हाच्या कटाविरूद्ध' या कवितासंग्रहाला आणि मोनिका गजेंद्रगडकर यांच्या 'शिल्प' या कथासंग्रहालाही पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या 'कवीराय रामजोशी' कादंबरीलाही विशेष पुरस्कार देण्यात आला आहे. येत्या 16 डिसेंबरला या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. भैरु रतन दमाणी पुरस्कारांचं हे 23 वं वर्षं आहे.

close