उरणच्या खाडीत लाखो मासे मृत अवस्थेत आढळली

November 17, 2011 11:02 AM0 commentsViews: 4

17 नोव्हेंबर

रायगड जिल्ह्यातील उरण इथं फुंडे गावाजवळच्या खाडीत लाखो मासे मरून पडले आहे. त्यामुळे गावकर्‍यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पाणजे समुद्रकिनार्‍यापासून अडीच किलोमीटर आत खाडीत हे मासे होते. सकाळी भरतीचं पाणी ओसरल्यानंतर खाडीच्या किनार्‍यावर माश्यांचा खच पडला होता. तर पाण्याला केमिकल मिशि्रत वास येत होता. त्यामुळे खाडीतल्या केमिकल मिशि्रत पाण्यामुळेच हे मासे मेले असल्याचा आरोप स्थानिक गावकर्‍यांनी केला. घटनास्थळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी पोहचेले असून प्रयोग शाळेत तपासणीसाठी इथले मासे आणि पाण्याचे नमुने पाठवण्यात आले आहे. जोपर्यंत तपासणी अहवाल येत नाही तोपर्यंत मासे खाऊ नये असा सल्ला अधिकार्‍यांकडून देण्यात आला.

close