भारतीय टीमचा पाकिस्तान दौरा नियोजित वेळेनुसार

November 18, 2008 5:54 PM0 commentsViews: 3

18 नोव्हेंबरजानेवारीत होणारा भारतीय टीमचा पाकिस्तानचा दौरा नियोजित वेळेनुसारच होणार असल्याचं बीसीसीआयतर्फे कळवण्यात आलं आहे.बीसीसीआयनं तसं पीसीबीला आश्वासन दिलं आहे. सुरक्षेच्या कारणावरून दौरा पुढे ढकलण्याची चर्चा सुरू झाली होती. पण या बातमीचं बीसीसीआयनंच खंडन केलं आहे. दौरा नियोजित वेळापत्रकानुसार म्हणजेच 6 जानेवारी पासून सुरू होण्याची हमी बीसीसीआयनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिली आहे.

close