‘पाऊलवाट’ चं प्रिमियर थाटात

November 17, 2011 12:53 PM0 commentsViews: 2

17 नोव्हेंबर

पाऊलवाट हा नवा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होत आहे.या सिनेमाचा प्रिमियर नुकताच पार पडला. सिनेमातल्या कलाकारांबरोबरच अनेक मान्यवरांनीही यावेळी उपस्थिती लावली. यात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनय देव, रमेश देव, अतुल कुलकर्णी आदी कलाकार सहभागी होते. एका स्ट्रगलरचा जीवनप्रवास मांडणारा हा सिनेमा त्याच्या आयुष्यातल्या विविध व्यक्ती आणि नात्यांमधले उतारचढाव मांडतो. संगीतकार नरेंद्र भिडे यांचीही पहिलीवहिली निर्मिती आहे तर सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य इंगळेनं केलं आहे.

close