नितेश राणेंच्या ऑफरची राष्ट्रवादीने उडवली खिल्ली

November 17, 2011 1:26 PM0 commentsViews: 1

17 नोव्हेंबर

काँग्रेसने राष्ट्रवादीऐवजी स्वाभिमानशी आघाडी करावी या नितेश राणेंच्या ऑफरची राष्ट्रवादी काँग्रेेसने खिल्ली उडवली. पोरा-टोरांच्या वक्तव्यांवर आम्ही प्रतिक्रिया देत नाही राष्ट्रवादीच्या ताकद काँग्रेसला माहिती आहे असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी लगावला आहे. काल बुधवारी स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी जाहीरपणे राष्ट्रवादीशी आघाडी करण्यापेक्षा आमच्याशी आघाडी करावी अशी ऑफर नितेश राणे यांनी दिली होती. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मोजक्याच जागा येतील असा टोलाही राणे यांनी लगावला होता. नितेश राणे यांच्या विधानाचा समाचार घेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी आपला अनुभव सांगत पोरा-टोरांच्या वक्यव्यांवर प्रतिक्रिया देण्यात काय अर्थ आहे. काँग्रेसला राष्ट्रवादीची ताकद काय आहे त्यांना चांगलं माहित आहे असं मत पिचड यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलं.

close