पोर्टेबल सोनोग्राफी मशिन हॉस्पिटलबाहेर नेण्यास मनाई

November 18, 2011 2:20 PM0 commentsViews: 3

18 नोव्हेंबर, मुंबई

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी मुंबई हायकोर्टानं आणखी एक पाऊलही टाकलंय. पोर्टेबल सोनोग्राफी मशिन हॉस्पिटलच्या बाहेर नेण्यास मुंबई हायकोर्टानं मनाई केलीये. ही मशिन्स ज्या संस्था किंवा हॉस्पिटलच्या नावानं असतीलं त्यांनाच या मशीन्स वापरता येतील. मुंबई महापालिकेच्या एका वॉर्डानं परिपत्रक काढून पोर्टेबल मशिनच्या वापरावर निर्बंध आणले होते..त्याला रेडिओलॉजिस्ट्स व इमेजिंग असोसिएशननं हायकोर्टात आव्हान दिलं होतं. अंथरूणाला खिळून असलेल्या पेशंट्ससाठी ही सेवा अत्यावश्यक असल्याचा दावा त्यांनी केला होता.पण ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली.या सुनावणीत उदय वारुंजीकर यांनी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांची बाजू मांडली.

close