शिर्डीच्या ट्रस्टींची बनावट नंबरच्या गाड्यात सफर

November 17, 2011 3:28 PM0 commentsViews: 3

17 नोव्हेंबर

शिर्डी संस्थानच्या चार ट्रस्टीजनी बैठकांच्या प्रवासभत्त्याचा दुरुपयोग केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहेत. रमाकांत कर्णीक, उर्मीला जाधव, कॅप्टन सुरेश वासुदेव या ट्रस्टीजने मंत्रालयातल्या त्यांच्या बैठकांसाठी काही प्रवासभत्ता आकारला. मात्र, त्यांनी दिलेले गाड्यांचे नंबर स्कूटर आणि ट्रकचे असल्याची धक्कादायक माहिती, माहितीच्या अधिकारातून पुढे आली. संजय काळे यांनी केलेल्या अर्जातून ही माहिती पुढे आली. शिर्डी संस्थानमध्ये चालणार्‍या भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे हे टोक असल्याचं बोललं जातं आहे. संस्थानच्या अध्यक्षांनी मात्र यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

close