राज ठाकरे घेणार उमेदवारांची परीक्षा !

November 19, 2011 5:48 PM0 commentsViews: 11

19 नोव्हेंबर

लोकांचे प्रतिनिधीत्व करताना प्रत्येकजण सक्षम असलाच पाहिजे आणि लोकांनाही सक्षम उमेदवार निवडून दिल्याचे समाधान मिळाले पाहिजे यासाठी प्रत्येक मनसे उमेदवाराला परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत पास झालेल्यांच्या मुलाखती स्वत: राज ठाकरे घेणार आहेत.

मनसेच्या पदाधिकार्‍यांचा आज षण्मुखानंदमध्ये मेळावा पार पडला यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांची चांगलीच शाळा घेतली. महापालिकेसाठी आपण खरंच परीक्षा घेणार असल्याचे राज ठाकरेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. तसेच विधानसभेसाठीही परीक्षा घेणार असल्याचे राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

येत्या महापालिका निवडणुकांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणशिंग फुकले. त्याच बरोबर राज यांनी यावेशळी इच्छुक उमेदवारांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. येण्यार्‍या निवडणुका ह्या लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नासाठी लढवल्या जातात त्यांचे प्रश्न,त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी या निवडणुका आहे. त्यामुळे मनसेच्या प्रत्येक उमेदवाराला परीक्षा द्यावीच लागणार आहे ज्या वार्डातून आपण निवडणुका लढवणार आहे त्या पालिकेच्या माहिती उमेदवाराला असलीच पाहिजे असं राज यांनी उमदेवारांना ठणकावून सांगितले.

जर लोकांना माझ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करायचे असेल तर तो सक्षम आहे की नाही हे कोण तपासणार ? उद्या जर मनसेचा उमेदवार स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवडला गेला तर महापालिकेच्या कारभाराची माहितीही त्याला असलीच पाहिजे त्यामुळे त्याला परीक्षा द्यावीच लागेल असंही राज यांनी स्पष्ट सांगितले. यापुढच्या विधानसभा निवडणुकासाठी सुध्दा परीक्षा घेतल्याच जातील आणि जर मला स्वत: ला परीक्षा द्याची ठरली तर ती सुध्दा मी देण्यास तयार असेल असंही राज यांनी स्पष्ट केलं.

close