दारु विक्रेत्यांचा कहर ; ‘देशी’ लपवली देवालयाखाली !

November 17, 2011 3:31 PM0 commentsViews: 21

17 नोव्हेंबर

दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्हयात दारु विक्रेत्यांनी देवालयाचाच आसरा घेण्याचा सपाटा लावला आहे. देवळी पोलिसांनी अडेगाव येथील एका दारु विक्रेत्याकडे धाड घातली असता भन्नाट प्रकार उघडकीस आला. अडेगाव येथील जानराव चिडाम याने घराच्या देव्हार्‍याच्या आत एक मटका ठेवून त्यावर दारुच्या बाटल्या लपवून त्यावर देव ठेवून पूजाअर्चा करायला सुरवात केली. त्याच्या घरावर अनेकदा पोलिसांनी धाड घातली मात्र अनेकदा पोलिसांना रिकामं परतावं लागलं. शेवटी पोलिसांनी देव्हार्‍याची झडती घेतली तेव्हा देव्हार्‍यात दारु लपवण्याचा प्रकार उघडकीस आला.

close