कापूस आंदोलन : रवी राणांची प्रकृती खालवली

November 19, 2011 9:23 AM0 commentsViews: 6

19 नोव्हेंबर

कापसाला वाढीव हमीभावाच्या मागणीसाठी गेले 6 दिवस उपोषण करणार्‍या आमदार रवी राणा यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या ह्रदयामध्ये बिघाड झाल्याची माहिती सिव्हिल सर्जन डॉ. संजय शेंडे यांनी दिली. रवी राणा यांच्या किडणीवर सूज आल्याने नागपूर गव्हरमेंट मेडिकल कॉलेजला हलविणार असल्याचीही माहिती डॉ.संजय शेंडे यांनी दिली.

त्यांच्या समर्थनार्थ आज अमरावती बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. या बंदमध्ये आरपीआय, मनसे, जनसंग्राम पक्ष, आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना, माजी मंत्री सुनिल देशमुख जनविकास काँग्रेस सहभागी झाले आहेत. दरम्यान,शेतकर्‍यांना वाढीव हमीभाव मिळेपर्यंत आपलं उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं रवी राणा यांना सांगितलं.तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना नंदुरबारमध्ये घेराव घालण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौफुलीवर हे आंदोलन करण्यात आलं. शिवसेनेच्या वतीनं कापसाला भाव मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

close