दिलीप प्रभावळकर यांना गदिमा पुरस्कार जाहीर

November 17, 2011 3:42 PM0 commentsViews: 24

17 नोव्हेंबर

यंदाचे गदिमा प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षीचा गदिमा पुरस्कार अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाला आहे. गृहिणी सखी सचिव पुरस्कार, जेष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांना जाहीर झाला. या पुरस्काराचं स्वरूप पाच हजार रूपये, सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र असं आहे. गदिमा स्नेहबंध पुरस्कार स्वातंत्रसैनिक रावसाहेब शिंदे यांना तर चैत्रबन पुरस्कार लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांना जाहीर झाला. पुण्यातल्या टिळक स्मारकात 14 डिसेंबरला होणार्‍या कार्यक्रमात हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

close