कापूस प्रश्नी मनसेचं शोले स्टाईल आंदोलन

November 19, 2011 8:29 AM0 commentsViews:

19 नोव्हेंबर

कापूस, सोयाबीनला वाढीव हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी सर्वच स्तरातून आता आंदोलन पेटलं आहे. बरेच राजकीय पक्ष, संघटनांनी या आंदोलनात उड्या घेतल्यानं हे आंदोलन तीव्र होत चाललं आहे. वाशिम मधल्या मंगरूळपीर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांने एक अनोखं आंदोलन सुरू केलं आहे. बी.एस.एन.एल. च्या टॉवरवर चढून हे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.

जोपर्यंत कापसाला वाढीव हमीभाव मिळणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशा प्रकारची भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली. या आंदोलनात मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष सुनील मालपाणी आणि दोन कार्यकर्ते सामील झाले आहे. या टॉवर आंदोलनाला 19 तास उलटून गेले आहेत. पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणा त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर सरकारने हे आंदोलन हानून पाडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर टॉवरवरून उडी मारण्याचा इशारा आंदोलक कार्यकर्त्यांनी दिला.

close