कापूस प्रश्नी भाजपचे चक्का जाम आंदोलन

November 19, 2011 10:32 AM0 commentsViews: 3

19 नोव्हेंबर

कापसाला 6 हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. नागपूर – हैदराबाद मार्गावर भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं. मंुबई नागपूर हायवेवर खामगाव इथं आज भाजप नेते पांडूरंग फुंडकर आणि त्यांच्या समर्थकांनी एक तास रास्ता रोको केला. कापसाला आणि सोयाबीनला वाढीव हमीभाव मिळावा यासाठी आज हा रास्ता रोको कऱण्यात आला. या आंदोलनाची वेळी पोलिसांनी पांडुरंग फुंडकरांसह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

close